Share

दरवाढीचा फायदाघेत डिझेलची चोरी, ३४८० लिटर डिझल चोरत चोरट्यांची जत्रा

Published On: 

औरंगाबाद : सध्या चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नाही आहे. सध्या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोदात असताना, चोरट्यांनी पेट्रोल पंपावर डल्ला मारत, ३ लाख ४५ रुपयांचे ३ हजार ४८० लिटर डीझेल चोरून नेले. हि घटना दि १७ रोजी रात्री श्री पेट्रोलीअम BPCL पंप चितेगाव येथे घडली. या प्रकरणी प्रदीप प्रल्हाद राठोड रा. N ३, सिडको यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितेगाव येथील पेट्रोल पंपच्या कंपौंडच्या तारा तोडून अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल पंपा मध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी डीझेलच्या टाकीचे झाकण तोडले, त्यानंतर टाकीमधून ३ हजार ४८० लिटर डीझेल चोरून नेले. हा प्रकार दि १७ रोजी रात्री १ ते ५ च्या दरम्यान घडला. हि माहिती प्रदीप राठोड यांना मिळाली. त्यांनी पेट्रोल पंप गाठला.

पंपाची पाहणी केल्यानंतर डीझेलच्या टाकी मधून डीझेल चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह लहू थोटे तपास करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!