Share

हद्द झाली : चोरट्यांनी दुकानातून चक्क 20 गावरान कोंबड्या केल्या गायब

Published On: 

पुणे : आषाढ महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जातो. मात्र आखाडी साजरी करण्यासाठी पुण्यात कमालच झालीय. हडपसर येथे चक्क कोंबड्यांचीच चोरी करण्यात आली आहे. हडपसर हिंगणेमळा येथे हाजी चिकन शॉप शेजारील एका पिंजऱ्याचे कुलूप तोडून तब्बल 20 गावरान कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

हडपसरच्या हिंगणे मळ्यात असणाऱ्या एका चिकन सेंटरच्या दुकानातून चक्क वीस कोंबड्या चोरी चोरट्यांनी आखाड साजऱ्या करण्यासाठी केलीय. मात्र चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. हिंगणे मळ्यातील इस्लाम शेख हा चिकन विक्रेता नेहमीप्रमाणे रात्री चिकन सेंटर  बंद करून घरी गेला.त्यानंतर काल पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी  पिंजऱ्यात ठेवलेला कोंबड्या कुलूप तोडून पोत्यामध्ये तब्बल वीस कोंबडी भरल्यानंतर दुचाकीवरून धूम ठोकली.

रविवारी चिकनसाठी लोकांची गर्दी असते. मात्र कोंबड्याच चोरीला गेल्यानं मालकाला मोठं नुकसान सहन करावा लागलं आहे. दुकानाशेजारील योगेश हिंगणे यांनी याबाबत दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. आता या चिकन सेंटरच्या मालकाने हडपसर पोलीस ठाण्यात 500 रुपयाच्या 20 कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान, आखाड पार्टी करण्यासाठीच या कोंबड्या चोरल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!