पुणे : आषाढ महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जातो. मात्र आखाडी साजरी करण्यासाठी पुण्यात कमालच झालीय. हडपसर येथे चक्क कोंबड्यांचीच चोरी करण्यात आली आहे. हडपसर हिंगणेमळा येथे हाजी चिकन शॉप शेजारील एका पिंजऱ्याचे कुलूप तोडून तब्बल 20 गावरान कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
हडपसरच्या हिंगणे मळ्यात असणाऱ्या एका चिकन सेंटरच्या दुकानातून चक्क वीस कोंबड्या चोरी चोरट्यांनी आखाड साजऱ्या करण्यासाठी केलीय. मात्र चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. हिंगणे मळ्यातील इस्लाम शेख हा चिकन विक्रेता नेहमीप्रमाणे रात्री चिकन सेंटर बंद करून घरी गेला.त्यानंतर काल पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी पिंजऱ्यात ठेवलेला कोंबड्या कुलूप तोडून पोत्यामध्ये तब्बल वीस कोंबडी भरल्यानंतर दुचाकीवरून धूम ठोकली.
रविवारी चिकनसाठी लोकांची गर्दी असते. मात्र कोंबड्याच चोरीला गेल्यानं मालकाला मोठं नुकसान सहन करावा लागलं आहे. दुकानाशेजारील योगेश हिंगणे यांनी याबाबत दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. आता या चिकन सेंटरच्या मालकाने हडपसर पोलीस ठाण्यात 500 रुपयाच्या 20 कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान, आखाड पार्टी करण्यासाठीच या कोंबड्या चोरल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

