Share

काम संपताच चोरांचा साहित्यावर डल्ला! ऑईल-गॅस पाईपलाईनचे ८३ हजारांचे साहित्य लांबवले

Published On: 

औरंंगाबाद : के.पी.टी.एल. कंपनीच्या ऑईल व गॅस लाईनचे काम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणावरून दिवसभराचे काम संपताच चोरट्याने ८३ हजार रूपये किंमतीचे साहित्य लंपास केले. ही घटना १२ जूनच्या रात्री घडली असल्याची माहिती वाळूज पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.

वाळूज एमआयडीसी परिसरात के.पी.टी.एल. कंपनीची ऑईल व गॅस पाईप लाईन टाकण्याचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. १२ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने वंâपनीचे काम सुरू असलेल्या साईटवरून कॉपर वेल्डींग केबल, कॉपर इलेक्ट्रीक केबल, कॉपर वायर व इतर साहित्य असे एकूण ८३ हजारांचे साहित्य चोरून नेले.

हा प्रकार लक्षात आल्यावर संदीपसिंह महेंद्रसिंह (वय ४०,रा.आनंदकॉलनी, यमूनानगर, हरियाणा, ह.मु.नेवासा फाटा, अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नारायण बुट्टे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!