उत्तर प्रदेश: युपीमधील सीतापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार (Independent candidate Saket Mishra) म्हणून निवडणूक लढवणार आहेत. मात्र सध्या ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत.साकेत मिश्रा आजही निवडणूक काळात ‘मोदी रसोई’ नावाने खानावळ चालवत आहेत.त्यामुळे त्यांची सध्या देशभर चर्चा आहे.
साकेत मिश्रा गेल्या दोन महिन्यांपासून ‘मोदी रसोई’ नावाने खानावळ चालवत आहेत. दरम्यान भाजपने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलेलं नाही. त्यामुळे आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र अजूनही ते मोदी रसोई नावाने खानावळ चालवत असल्याने त्यांचीच चर्चा सध्या युपी निवडणुकीत रंगत आहे.
दरम्यान साकेत मिश्रा यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि,”मी गेल्या दोन महिन्यांपासून स्वत: ‘मोदी रसोई’ चालवत आहे आणि स्वत: जेवण तयार करून नागरिकांना देत आहे. मला तिकीट न देण्यात मोदी किंवा योगी यांची काहीच चूक नाही. त्याखालील खासदार आणि जिल्हा अध्यक्षांनी मला धोका दिला आहे. तिकीट न देता माझा राजकीय खून केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान १४ वर्षांपासून साकेत मिश्रा भाजपमध्ये होते,मात्र उमेदवारी तिकीट न दिल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या ते ‘मोदी रसोई’ मुळे जाम चर्चेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही”, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
- पुण्यातील कर्वे रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न मिटणार, काय आहे कारण …
- “..तिने कमजोरांना संदेश देत मिसाल सिद्ध केली”, कर्नाटकातील घटनेवर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया
- हिजाब वादानंतर कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; तीन दिवस शाळा, महाविद्यालये बंद
- पंजाब मध्ये काँग्रेस पक्षाला फटका बसण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

