Share

धक्कादायक! भगवंत मान, राज्यपालासंह ३ रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची पत्राद्वारे धमकी…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आणखी महत्त्वाच्या व्यक्तींना बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्याने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्याचं निवासस्थान, राज्यपाल, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांच्या घराला आणि मंदिरांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सुल्तानपूर लोधी रेल्वे स्टेशनवर मिळालेल्या पत्राच्या खाली पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मदचा कमाडंर सलीम अन्सारी याचे नाव आहे. सुल्तानपूर लोधी येथील डीएसपी राजेश कक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पत्र रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटरवर ठेवण्यात आली होतं. बुधवारी दुपारी सुल्तानपूरमधील लोधी रेल्वे स्टेशनवर पत्र मिळालं. पंजाबमधील सुल्तानपूर लोधी, फिरोजपूर आणि जालंधर ही रेल्वे स्टेशन देखील उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

जालंधर, सुल्तानपूर लोधी, फिरोजपूर, लोहियांखास, फगवाडा आणि तरणतारण रेल्वेस्टेशनवर २१ मे रोजी स्फोट होतील, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पंजाबचे राज्यपाल, विभागीय रेल्वे मॅनेजर सीमा शर्मा, अकाली दलाचे नेते यांच्यावर २३ मे रोजी हल्ला केला जाईल, अशी धमकी त्या पत्राद्वारे देण्यात आली आहे. पटियालामधील देवी तलाव मंदिर,काली माता मंदिर, फगवाडामधील हनुमान मंदिरात देखील स्फोट केले जातील अशी धमकी देण्यात आली आहे.

पंजाबचं पोलीस दल या सुल्तानपूर लोधी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांना पत्र मिळाल्यानंतर धक्का बसला आहे. स्टेशन मास्तरनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. स्टेशन मास्तरना मिळालेल्या पत्रावर पोस्टाचं तिकिट चिकटवण्यात आलं आहे. पण त्यावर तारिख आणि शिक्का नाही.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!