नवी दिल्ली : या वेळेच्या आयपीएलचा हंगाम मोठ्या उत्साहाने पार पडला. कॅप्टन कुल धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने या वेळेचा हंगाम जिंकला. सध्या आयपीएल च्या स्पर्धेत ८ संघ खेळताना दिसत होते. परंतु पुढच्यावर्षी २०२२ मधल्या आयपीएल मोसमात १० संघ खेळताना दिसणार आहेत. त्या संबंधीची माहिती काल बीसीसीआयने दिली.
काही दिवसापूर्वी बीसीसीआयने आयपीएल मधील नवे संघ विकत घेण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार २२ कंपन्यांनी यासंदर्भात बोली लावली होती. आयपीएलच्या दोन संघांची निवड करण्यासाठी जवळपास ४ तास अर्जांची छाननी करण्यात आली आणि त्यानंतर ७,१०० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली संजीव गोएंका यांनी लावल्याचे समजले. संजीव गोएंका यांनी या पूर्वी पुणे संघ विकत घेतला होता. दोन वर्ष हा संघ आयपीएल खेळतांना दिसला. परंतु गोएंका यांनी पुन्हा एकदा आयपीएल मध्ये पुनरागमन करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी आपल्या नव्या संघाला लखनऊ हे नाव दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या मोसमात लखनऊ संघ खेळताना दिसेल.
त्यानंतर दुसरा संघ म्हणून अहमदाबाद संघाचे नाव पुढे आले आहे. सीव्हीसी कॅपिटल या कंपनीने ५,६२४ कोटी रुपये खर्च करत अ़हमदाबाद संघ विकत घेतला आहे. या निविदा मध्ये अनेक लोकांनी आपल्या बोली लावल्या परंतु या दोनच जणांनी जास्त किंमत लावून संघाची मालकी आपल्याकडे खेचली. त्यामुळे येणाऱ्या हंगामात आयपीएल पाहणाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाल्या शिवाय राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘या’ वकिलाच्या माध्यमातून समीर वानखेडेंनी बॉलिवूडमधून खंडणी वसूल केली’; मलिकांचा गौप्यस्फोट
- वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची ॲड कनिष्क जयंत यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

