मुंबई : मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आता त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यांकडून खंडणी कथित वसूली करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या दलालाचे नाव जाहीर केले आहे. कलाकारांकडून खंडणी वसूल करुन त्यांना वकीलपत्र मिळवून देणारा अयाज खान नामक व्यक्ती असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्राच्या अधारे केला आहे.
वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली कशी झाली, याचा खुलासाही मलिकांनी या पत्रात केला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास एनसीबीकडे सोपविण्यात आल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन संचालक राकेश अस्थाना यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सांगून वानखेडे यांची विभागीय संचालक पदी नेमणुक केली होती. बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना दिले गेले होते.
गुन्हे दाखल होताच कोट्यवधी रुपये वसुली केली गेली. त्यातील वाटा राकेश अस्थाना यांनाही मिळाला होता. दीपिका पादुकोन, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांच्याकडून पैसे घेतले गेले. अयाज खान नामक वकिलाने ही खंडणी वसुल केली होती्. हा अयाज खान समीर वानखेडे यांच्या वतीने बॉलिवूडमधून पैसे गोळा करतो.
एनसीबी कार्यालयात त्याचा मुक्त वावर असतो. खंडणी गोळा करून देण्याच्या बदल्यात समीर वानखेडे अयाज खानला बॉलिवूड कलाकारांचे वकीलपत्र मिळवून देतो, असा आरोप मलिक यांनी या पत्राच्या आधारे केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘ते’ प्रकरण हिमनगाचे एक टोक, मालक व नोकरांनी सावध राहावे; राऊतांचा इशारा
- गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार; सत्यपाल मलिकांचा आरोप

