मुंबई: राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन राज्यात निर्बंध शिथिल होतील का, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठकरे घेणारअसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबतचा अहवाल राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांना सदर केला आहे. राज्याचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी निर्बंध कमी होणे गरजेचे असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. ५०टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल.दोन डोस झालेल्यांना रेल्वेने प्रवास करता येऊ शकतो का,याची चाचपणी सुरु आहे. पण तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ॲागस्ट पर्यंत थांबता येईल का, याचाही विचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्याचा रेट सरासरी पेक्षा अधिक असल्याने तेथील कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाही. मात्र इतर जिल्ह्यात जे निर्बंध लेव्हल तीनचे आहेत. त्यांच्यासंदर्भात आरोग्य विभागामार्फत सूचना मुख्यमंत्र्याना केल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निवड आपलीच आहे जंगलाचा राजा हवा की…,शरद पवारांचा सवाल
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

