मुंबई: २९ जुलैरोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करणे आणि जागतिक यंत्रणेला चालना देणे तसेच व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे यामागील धोरण असते. याच निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संग्रहालयातला भुसाधारी वाघ हवा की जंगलचा राजा, असा सवाल करत समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने र्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कमी होणारे जंगलक्षेत्र,वृक्षतोड यांसारख्या घटकांमुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर मोठा परिणाम होत आहे. वाघ नामशेष होऊ नयेत यासाठी अवैध व्याघ्रशिकारीला आळा घालून वाघांच्या अधिवासाचे रक्षण, व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांचे संवर्धन करण्याचा या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करुया. निर्णय आपलाच आहे. संग्रहालयातला भुसाधारी वाघ हवा की जंगलचा राजा? अशा आशयाची पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.
कमी होणारे जंगलक्षेत्र,वृक्षतोड यांसारख्या घटकांमुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर मोठा परिणाम होत आहे. वाघ नामशेष होऊ नयेत यासाठी अवैध व्याघ्रशिकारीला आळा घालून वाघांच्या अधिवासाचे रक्षण, व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांचे संवर्धन करण्याचा या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करुया. pic.twitter.com/VCuWmJnjUu
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 29, 2021
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी ‘त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे’ या थीमने साजरा केला जातो.जागतिक वन्यजीव निधी च्या रिपोर्टनुसार जागतिक पातळीवर सध्या ३९०० वाघ शिल्लक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाघांच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी या हेतूने दरवर्षी २९ जुलैरोजी व्याघ्रदिन साजरा केला जातो. दरम्यान शरद पवार यांनी व्याघ्र संरक्षणासाठी निर्धार करण्याचे आवाहन या पोस्टमध्ये केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप


