मुंबई : काल(२ जाने.) पत्रकार परिषदेत बोलत असतांना राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे मलिक म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी सुल्ली डील अॅपचा वापर करून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे हे अतिशय निंदनीय आहे, असे म्हंटले आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’सुल्ली डीलचा वापर करून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे हे अतिशय निंदनीय आहे. भारतीय संस्कार आणि संस्कृतीमध्ये यांना कुठलेही स्थान नाही. हे धार्मिक राक्षस भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाहीत. हा देश Genocide कडे चालला आहे असे वाटायला लागलंय’, असे आव्हाड म्हणाले आहेत.
#BulliDeals #SulliDeals
चा वापर करून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे हे अतिशय निंदनीय आहे. भारतीय संस्कार आणि संस्कृतीमध्ये यांना कुठलेही स्थान नाही. हे धार्मिक राक्षस भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाहीत. हा देश Genocide कडे चालला आहे असे वाटायला लागलंय.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2022
दरम्यान, या अॅप संदर्भात अधिक माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सांगितले की,’सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लिम महिलांचे फोटो,प्रोफाइल व त्यासमोर किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते. या सुल्ली डील ॲप वरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्ध सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत.’
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र


