Share

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत ‘या’ खेळाडूंची खेळण्याची शक्यता कमी ; मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ

Published On: 

मुंबई :  मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आखेर शनिवारी २९ मे रोजी बीसीसीआयने एका सर्वसाधारण बैठकीत आयपीएलच्या उर्वरीत सामन्याविषयी घोषणा केली.

आयपीएल २०२१च्या उर्वरीत सामन्याची घोषणा होताच क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. मुंबईचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड आयपीएलच्या सुरुवातीच्या काही मॅच उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.

करण, कॅरेबियन प्रीमियर लीग 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. या लीगमध्ये कायरन पोलार्डसह क्रिस गेल, सुनिल नारायण, ड्वॅन ब्राव्हो या खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा 19 किंवा 20 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे.

अशात क्वारंटाईनच्या नियमांमुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएलसाठी उशीरा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे कॅरेबियन प्रीमियर लीग ही स्पर्धा 10 दिवस आधी खेळवण्यात यावी, अशी चर्चा बीसीसीआय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबत करत आहे. सीपीएल 10 दिवस आधी सुरू झाली तर, वेस्ट इंडिजचे खेळाडू संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध होतील, पण जर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक बदलायला नकार दिला, तर मात्र आयपीएलमधील काही संघाला याचा फटका नसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!