🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी सामन्यांसाठी रवींद्र जडेजाचे पुन्हा टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले.
टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा या ब्रेकमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी जय्यत तयारी करताना दिसत आहे. आता जडेजा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी उत्सुक आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त खेळ करत फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने अनेक वेळा आपल्या अष्टपैलु खेळीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. रविंद्र जडेजा आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामध्ये 2019 वर्ल्ड कपदरम्यान वाद झाला होता. वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करताना संजय मांजरेकर यांनी जडेजा बिट्स ऍण्ड पिसेस म्हणजेच थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, जडेजाला त्यांचे हे वक्त्यव्य जडेजाला फारसे आवडले नव्हते यानंतर रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 77 रनची खेळी करून बॅटने तलवारबाजी करत सेलिब्रेशन केले. ‘मी कॉमेंट्री बॉक्स शोधत होतो. मग मी विचार केला, ते कुठेतरी असतीलच, मी ते सेलिब्रेशन कोणावर निशाणा साधण्यासाठी करत होतो, ते सगळ्यांना माहितीच आहे,’ असेदेखील जडेजा म्हणाला. हा सेलिब्रेशनचा इशारा संजय मांजरेकर यांनाच होता याचा खुलासा जडेजाने यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- काळी जादू, काळी विद्या माहीत होती मात्र आता काळा फंगस आलाय – उद्धव ठाकरे
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- मोठी बातमी : तुमच्या शहरात/जिल्ह्यात कोणते नवे नियम ? राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही, त्यात तिसरी लाट आली तर…’


