Share

सोलापुरातील शेतकऱ्यांसमोर सरकारने टेकले गुडघे, उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द

Published On: 

पुणे – इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरुन मंजुर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा मागील आठ दिवसांपासून प्रलंबित असलेला आदेशच अखेर रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरच्या लोकप्रतिनिधींसमोर झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी हा आदेश दिला आहे.त्यानुसार उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांड पाणी उजनी जलाशयातून उचलून नवीन मुठा उजवा कालव्यात सोडण्याबाबतचा शासनाचा २२ एप्रिल २०२१ रोजी व समकक्ष असणारे आदेशच रद्द केला आहे.

जयंत पाटील यांनी 18 मे रोजी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला देणार नाही. तसा या पूर्वी काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे तोंडी सांगितले होते. परंतु, जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही.तोपर्यंत आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. अखेर आज उप सचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे.

दरम्यान, उजनी धरणातून इंदापूरला पाणी वळवण्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. विविध शेतकरी संघटनांसह पाणी संघर्ष समितीने सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. काल शरद पवार यांच्या गोविंद बागेतील निवास स्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर बोंबाबोब आंदोलन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!