मुंबई : राज्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन राज्यातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय व राज्यमहामार्गावरील खड्डे, दुरुस्ती व उपाययोजनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी आढावा बैठक घेतली. राज्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत आपली भूमिका मांडली आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/amitthackerayofficial/posts/1540134559674224
अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत महा विकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच : कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक ताबडतोब बोलावण्याची गुलाम नबी आझाद यांची मागणी
- रस्त्यांच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री
- ‘मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी’, तेच कंत्राटदार, त्याच निविदा ‘सब गोलमाल है’
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल


