Share

रस्त्यांच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री

Published On: 

मुंबई : राज्यातील अनेक राष्ट्रीय व राज्यमहामार्गावरील खड्डे, दुरुस्ती व उपाययोजनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी आढावा बैठक घेतली. राज्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यांतील रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. मात्र निधीचा गैरवापर करणाऱ्या व गुणवत्ता न राखणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल असा ईशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. तसेच रखडलेले रस्त्यांची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेलले काम लवकर पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविताना गुणवत्तेवर लक्ष द्यावे, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावे, यासह आदी सुचना त्यांनी अधिकारी, अभियंते व मंत्र्यांना दिल्या.

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह कोकण, नाशिक, मराठवाडा, पुणे आदी विभागांचे मुख्य अभियंते, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!