मुंबई : मुंबईतील खड्ड्यांवर टीका झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एप्रिलपासून आतापर्यंत ४२ हजार खड्डे भरल्याचा दावा करत विरोधकांची टीका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी या खड्ड्यांची पाहणी करत कंत्राटदार आणि आधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. दरम्यान यावरच आता यावरच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
‘गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खड्ड्यात घातले. तरी मुंबईतील रस्त्यांचे ‘रस्ते’ लागले. आता धावते दौरे करुन कारवाईची आरडाओरड करुन काय सांगयताय? ‘मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी’ असा खोचक टोला लगावत त्यांनी तेच कंत्राटदार, त्याच निविदा आणि तिच थूकपट्टी करून कसं पटणार मुंबईकरांना? मात्र तुमच्या या कारभारामुळे खड्ड्यांचे पितळ उघडं केलं आहे. असा टोला आशिष शेलार यांनी हाणला आहे.
https://twitter.com/ShelarAshish/status/1443430512182267911
पालिका पोर्टल म्हणतेय खड्डे 927 आहेत फक्त. त्यात महापौरांची धावाधाव आणि 42,000 खड्ड्यांचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला. 48 कोटींचा निधी देऊनही शहरात रस्त्यांची चाळण झाली आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. याउलट कंत्राटदारांवर कारवाई करा म्हणायचं आणि पाठीमागच्या दाराने बिलं काढून कट-कमिशन खायचं. हा कारभार महापालिका करत आहे. ‘सब गोलमाल है’ असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे


