🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या एसयूव्ही (SUV) कार मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जात आहे. दिवसेंदिवस या गाड्यांच्या खरेदीदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या सेगमेंट मधील कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचबरोबर देशातील लोकांना या एसयूव्ही कार मधील काही आघाडीच्या कार आवडत आहे. त्या कार्सबद्दल आम्ही तुम्हाला आज या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.
मारुती ब्रेझा
देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुतीच्या मारुती ब्रेझा या एसयूव्हीला भारतीय बाजारपेठेमध्ये खूप जास्त मागणी आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये या कारचे जवळपास 9,941 युनिट विकले गेले आहेत. मारुतीची ही एसयूव्ही 1.5L पेट्रोल इंजिनद्वारे समर्थ आहे. जी 103PS पॉवर आणि 137Nm टार्क जनरेट करते. त्याचबरोबर या कार मध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील जोडलेले आहे. या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड्स-अप-डिस्प्ले आणि सनरूफ इत्यादी फीचर्स उपलब्ध आहे. तर या कारची एक्स-शोरुम किंमत 7.99 लाख ते 13.96 लाख रुपयांपर्यंत आहे.
टाटा नेक्सन
टाटाची टाटा नेक्सन ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑक्टोबर 2022 मध्ये सर्वाधिक विकली गेली आहे. भारतीय बाजारामध्ये ऑक्टोबर महिन्यात या एसयूव्हीची एकूण विक्री 13,767 युनिट्स आहे. या कारमध्ये 1.3L आणि 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5L, 4-सिलेंडर डिझेल इंडियन उपलब्ध आहेत. जे अनुक्रमे 120PS पॉवर आणि 170Nm टार्क निर्माण करू शकतो. या एसयूमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स पर्याय उपलब्ध आहे. टाटा नेक्सन या एसयूव्ही एक्स शोरुम किंमत 7.70 लाख ते 14.18 लाख रुपयांपर्यंत आहे.
टाटा पंच
टाटा पंच ही देशातील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये या एसयूव्हीच्या 10,982 युनिटची विक्री झाली आहे. ही एसयूव्ही 1.2L पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. जे 86PS पॉवर आणि 113Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर या कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलाइट्स, 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो एअर कंडिशनिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल इत्यादी फीचर्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर या कारची एक्स शोरुम किंमत 6 लाख ते 9.55 लाख रुपयांपर्यंत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | “दारू पिता का…” ; अजित पवारांनी घेतला अब्दुल सत्तारांचा समाचार, मुख्यमंत्र्याना आवाहन
- Arvind Sawant | “कालचा ठाण्यातील प्रकार मुख्यमंत्र्यांवर मोठं लांछन आहे”, अरविंद सावंत यांचं टीकास्त्र
- Sharad Pawar | जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्हानंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, म्हणाले…
- IPL 2023 | आयपीएल मधून पोलार्डने घेतली निवृत्ती, जाता जाता म्हणाला…
- Munde | मुंडे बहिण-भाऊ आले एकाच व्यासपीठावर अन् मग झालं असं काही की, सभागृहात नुसताच हश्शा पिकला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
