🕒 1 min read
Arvind Sawant | मुंबई : ठाणे येथील किसन नगर परिसर येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आमने-सामने आले (Shinde-Thackeray). यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
यावेळी, कालचा ठाण्यातील प्रकार मुख्यमंत्र्यांवर मोठं लांछन आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. तसेच शिंदे गटातील लोकांनी राजन विचारे यांच्यावर हल्ला केला. माझ्या मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, याचा शिंदे यांना त्रास होतो आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात येत होतं. हा परिसर एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. कार्यक्रमा दरम्यान ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात येत होतं. हा सगळा प्रकार कॅमेरमध्ये कैद झाला आहे.
यावेळी, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्हानंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, म्हणाले…
- IPL 2023 | आयपीएल मधून पोलार्डने घेतली निवृत्ती, जाता जाता म्हणाला…
- Munde | मुंडे बहिण-भाऊ आले एकाच व्यासपीठावर अन् मग झालं असं काही की, सभागृहात नुसताच हश्शा पिकला
- Vinayak Raut | “राजन साळवी शिंदे गटात सामील होणार?”; विनायक राऊत म्हणाले, “खाल्ल्या मिठाला…”
- Ajit Pawar | “वाचाळविरांना आवरा” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

