टीम महाराष्ट्र देशा : विजयादशमी निमित्त आज बीड येथील सावरगावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृवात भव्य दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. या भव्य मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी जनतेकडून काहीच अपेक्षा नसल्याचं म्हंटल आहे. केवळ जनतेची सेवा करायची आहे आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे वंचितांसाठी झटायचे आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाले की, अमित शहांनी 370 हटवून देशाला न्याय दिला आहे. माणूस जेव्हा खुश होतो जेव्हा मतावर नाहीतर मनावर राज्य करतो आणि जनतेच्या मनावर विराजमान होतो. माझ्या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी चांगले दिवस येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरी हा मेळावा असला तरी प्रचाराचा नारळफोडण्यासाठी हा कार्यक्रम नाही, असे मुंडे म्हणाल्या. जनतेचे इच्छेनेचं भगवान बाबांचे स्मारक उभे राहिले आहे. मला जनतेकडून काही अपेक्षा नाही. केवळ त्यांची सेवा करायची आहे. जनतेच्या दारात सेवा आणायची आहे, असेही मुंडे म्हणाल्या.
विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीने या मेळाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. या मेळाव्यातून अमित शहा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या विषयांना हात घालणार. यावर अनेकांचे लक्ष लागले होते. या मेळाव्याला भाजप नेते पंकजा मुंडे , प्रीतम मुंडे, भूपेंद्र यादव, राधाकृष्ण विखे पाटील , सुजय विखे पाटील, राम शिंदे, ओमराजे निंबाळकर, आदि मान्यवर उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

