Share

औरंगाबादेत होणार व्हर्टिकल गार्डन, उडणार पाण्याचे कारंजे

Published On: 

औरंगाबाद : शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने काही भागात व्हर्टीकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने महापालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी दिला असून, त्यातून व्हर्टीकल गार्डन विकसित केले जाणार आहेत. यासोबतच पाण्याचे कारंजेही सुरू केले जाणार आहेत. मात्र हे सर्व होईपर्यंत मनपावर विश्वास न ठेवलेलाच बरा.

शहरातील वाढत्या प्रदूषणाचा विषय काही वर्षांपासून गाजत आहे. एमआयडीसी भागातील कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोचले होते. शहरात देखील हवेतील धुळीचे कण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. वाढत्या प्रदूषणामुळे एमआयडीसीत नव्या कंपन्यांना परवानगी नाकारण्यात आली होती.

त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत महापालिकेने खुल्या जागांवर मियावाकी पद्धतीने हजारो झाडे लावून ऑक्सिजन हब तयार केले आहेत. हर्सूल तलाव परिसरात जांभूळबन विकसित करण्यात आले आहे.

त्यासोबत आता व्हर्टीकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पत्रकारांना सांगितले. पुढे पांडेय म्हणाले, राज्यातील अनेक शहरांमध्ये व्हर्टीकल गार्डन तयार करण्यात आले आहेत. औरंगाबादेत मात्र अद्याप एकही व्हर्टिकल गार्डन नाही.

केंद्र शासनाने शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यानिधीतून व्हर्टीकल गार्डन विकसित केले जातील. सोबतच काही ठिकाणी पाण्याचे कारंजे सुरू केली जातील. जेणेकरून हवेतील धुळीचे कण कमी होतील, असे पांडेय म्हणाले.

उड्डाणपुलाच्या भिंतीचा करणार उपयोग
शहरातील उड्डाणपुलाच्या भिंती, रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीचा वापर करून व्हर्टीकल गार्डन विकसित केल्या जाणार आहेत. लवकरच यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल, असे पांडेय यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!