Share

भराडीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई

Published On: 

औरंगाबाद : भराडी येथे कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढतच असुन शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोणाने शिरकाव करण्यास सुरुवात केलेली आहे. ग्रामीण भागात कोरोना रूग्णसंख्येला आळा बसावा व रुग्णाची संख्या नियंत्रणात रहावी.

यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने डीवायएसपी पुजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील भराडी येथे पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि.१९ विनामास्क दुकानदारानवर व रस्त्याने फिरणा-या नागरिकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. त्याच प्रमाणे दुचाकी, चार चाकी वाहन घेऊन विना मास्क गाडी चालकांवरही दंडात्मक करवाई करुन मास्क वाटप करण्यात आले. त्यांना दंडाची पावती देऊन दंड वसूल करण्यात आला.

सर्व नागरिकांनी व व्यवसायिकांनी शासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करून नियमित मास्क वापरणे, समाजिक अंतर ठेवणे आदी नियम पाळून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन गायकवाड यांच्या तर्फे करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरिक्षक पंडीत इंगळे, भराडी बिट जमादार देविदास जाधव, पोलीस नाईक संदीप कोथलकर, पोलीस कर्मचारी वैâलास द्वारकुंडे, सरपंच पप्पु जगनाडे, ग्रामविकास अशोक दौड, ग्रा.स.लिपिक वैâलास शेळके, एजाज पठाण, लक्ष्मण राकडे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!