मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
सचिन वाझे यांना NIAने अटक केली आहे. मात्र महाराष्ट्र एटीएसही या प्रकरणी तपास करत आहे. अशातच सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे.
एटीएसने तब्बल ४ पाणी अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता ATS ने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भराडीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली


