Share

‘त्या’ कारवाईची गरज नव्हती, शरद पवारांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला आज सकाळी सुरुवात करण्यात आली होती. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे. यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कंगना रणौतच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली आहे का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी ‘याबाबत अधिक माहिती नाही. पण सध्याची परिस्थिती बघता वेळ चुकली, तसेच अनधिकृत बांधकाम हा विषय मुंबईसाठी नवा नाही ‘अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, आता अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापली बाजू हायकोर्टात मांडतील.

महत्वाच्या बातम्या:-

निलंगा शहरातील मुख्य रस्त्यांची चाळ

कंगनाच्या कार्यालयावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती!

कंगना मुंबईत दाखल, विमानतळाबाहेर राडा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!