निलंगा/प्रदीप मुरमे:- लागल्याने या रस्त्यांवरुन चालत जाताना व वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याने शहरवासीयांमधून संबंधित प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. शहरातून जाणा-या ‘लातूर-बिदर’ हा राज्य मार्ग तर मागील अनेक दिवसापासून पुरता उखडून गेला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मागील अनेक दिवसापासून चालूच आहे! शहरातील मुख्य रस्ता अशी ओळख असलेल्या या रस्त्याची मागील अनेक वर्षापासून दुरवस्था झाल्याने शहरवासीयांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
परिणामी जीव मुठीत घेवून या रस्त्यावरुन नागरीकांना मार्गक्रमण करावे लागत असल्याचे विदारक चित्र या रस्त्यावर पाहायला मिळत आहे.मागील अनेक दिवसापासून या रस्त्याची वाट लागली असतानाही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र शहरवासीयांच्या या संवेदनशील प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सा.बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा तर काढत नाहीत ना ? असा संतप्त सवाल जाणकार नागरीकांना भेडसावत आहे.शहरातून जाणाऱ्या ३ कि.मी.लांबीच्या या राज्य मार्गाची देखभाल हा विभाग करु शकत नसेल तर निलंगा विभागातील असंख्य रस्त्यांची देखभाल कशी करणार?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शहरात राहणारे सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून या रस्त्याचा कामाचा विषय निकाली काढावा अशी मागणी जोर धरत आहे.शहरातील ‘शिवाजी चौक-बँक काँलनी’ या रस्त्याचीही मोठी दुरवस्था झाली आहे.या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता पुरता उखडून गेला आहे.जागोजागी मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. पाऊस आल्यानंतर तर या रस्त्यावरील खड्ड्यात मोठे पाणी साचत असल्याने या रस्त्याला अक्षरशः डबक्याचे स्वरुप प्राप्त होत असल्याने शहरवासीयांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली असतानाही संबंधित विभाग मात्र या रस्त्यावर मुरुम टाकून साधे खड्डे बुजविण्याचे देखील सौजन्य दाखवत नाही. एकुणच शहरातील मुख्य रस्त्यांच्या या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या या गलथान कारभाराबाबत जाणकार नागरीकांमधून संतंप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तरी वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे
छाया-खलील लालटेकडे,निलंगा
महत्वाच्या बातम्या:-
कंगनाच्या कार्यालयावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती
कंगना मुंबईत दाखल, विमानतळाबाहेर राडा
कंगना बद्दल प्रतिक्रिया देऊ नका , मातोश्रीवरून आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

