Share

जालन्यात म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत होतीये वाढ!

Published On: 

जालना: सध्या रोगांमध्येच चढाओढ सुरु झाली आहे की काय असा प्रश्न प्रत्येक माणसाला पडला आहे. एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे म्युकरमेकोसिस या नवीन रोगाची होणारी वाढ. कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली देखील नाही तेच तज्ञ मंडळी तिसऱ्या लाटेचा इशारा देऊन बसलेत. आता म्युकरमायलकोसिस हा आजार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळे चौघांचा मृत्यू देखील झाला आहे.

जिल्ह्यात बुधवारी एक म्यूकरमायकोसिसचा रुग्ण आढळून आला असून एकूण बाधितांची संख्या आता ३८ झाली आहे. दरम्यान, यातील १७ रुग्ण यशस्वी औषधोपचाराने बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत दुर्दैवाने चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सध्या १७ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसने डोके वर काढले. या आजाराचा उपचार खर्चही मोठा असून सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरील आहे.

जालना शहरातील खासगी दीपक हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. दरम्यान, या आजारावर प्रभावी ठरलेले अॅम्फोटेरेसिन इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांची परवड होऊ लागली. यामुळे काहींच्या शस्त्रक्रियाही लांबणीवर पडल्या. औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याने काही रुग्णांनी उपचारासाठी औरंगाबाद, पुण्याला जाणे पसंत केले. सर्वत्रच औषधींचा तुटवडा असल्याने रुग्ण आहेत त्याच ठिकाणी उपचार घेऊ लागले. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ रुग्ण बाधित झाल्यावर त्यातील १७ रुग्ण बरेही, झाले तर चौघांचा मृत्यू झाला. आता १७ रुग्ण उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!