Share

“पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे, मात्र त्यांनी कारवाईसाठी तयार रहावे”, चंद्रकांत पाटलांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी ‘त्याला मी मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’ वक्तव्य ज्या मोदीसाठी केले होते, तो गावगुंड सापडला असून उमेश प्रेमदास घरडे असे या कथित गावगुंडाचे नाव आहे. मात्र भाजपने हा नकली गावगुंड असल्याचे म्हटले आहे. तर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी नाना पटोले यांना गंभीर इशारा दिला आहे.

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना उद्देशून केलेले वक्तव्य हे दारुड्या गावगुंडासारखे आहे. हे प्रकरण अंगलट आल्यानंतर एका कथित गावगुंडाला समोर आणून पटोले स्वतःचा बचाव करू पाहत आहेत. पटोले आपल्या नेत्यांप्रमाणेच पळपुटेपणा करत आहेत, मात्र त्यांनी कारवाईसाठी तयार रहावे.

https://www.facebook.com/1503863456597524/posts/3040204869630034/

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारासमोर आला. त्या कथित गावगुडाने पत्रकाराशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

दरम्यान मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला होता. आता नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. मात्र पटोले यानी कारवाईला तयार रहावे, नंतर ‘तो मी नव्हेच’ असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!