Share

“वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा, बाबरी पाडली तेव्हा…”

Published On: 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला.

यावेळी शिवसैनिकांचे प्रतिपादन करत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,’बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले. नवहिंदू सगळे भंपक आहेत हे नव्या पिढीला माहिती व्हावे. त्यामुळे वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा.आपण महाराष्ट्रात राहिलो तेव्हा कदाचित आपण दिल्लीत आलो असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, अमित शहांचा अर्ज भरण्यासाठी गेलो. मनापासून त्यांचा प्रचार केला. आज एनडीए राहिली नाही. जुने ते सर्व गेले’, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,’शिवसेना इतर राज्यात सुध्दा निवडणुका लढवते आहे. हरलो तरी पराजयाने खचून जायचे नाही. विजयाचा उन्माद नको. कधी तरी जिंकणारच. नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांकावर असलो, तरी आम्ही जागा किती लढवल्या? अगदी युतीमध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या. आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हव्यात,’ असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!