मुंबई: विराट कोहली(Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची लाडकी लेक वामिका ( Vamika)अखेर टीव्हीवर झळकलीच. चाहते तसेच पत्रकार तिच्या एका झलकसाठी तरसत असताना वामिका अखेर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना चालू असताना टीव्हीवर झळकून आली.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना केपटाऊन येथे सुरु होता. २८८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने अर्धशतकासह संघाचा डाव सावरला. त्याने वनडे कारकिर्दीतील ६४ वे अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीनंतर VVIP गॅलरीतून सामन्याचा आनंद घेणाऱ्या अनुष्का शर्माकडे कॅमेरा वळला. आणि याचक्षणी वामिकाची पहिली झलक चाहत्यांच्या समोर आली.
She is soo soo cute????❤️
This one is for the baby❤️#ViratKohli #vamika #INDvsSAF pic.twitter.com/IyEvvSicqd— Ananya Sharma (@Theananyasharma) January 23, 2022
कोहलीने त्याचे अर्धशतक त्याची लाडकी वामिकाला समर्पित केले. त्याचे अर्धशतक सेलिब्रेशन करतानाच वामिकाचा चेहरा सर्वांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. कोहली आणि अनुष्का यांनी वामिकासोबतचे अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण तिचा चेहरा सर्वांना दिसणार नाही याची काळजी दोघांनीही घेतली होती. वामिकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिचा चेहरा समोर येऊ नये, या हेतूने त्यांनी वामिकाला कॅमेरापासून दूरच ठेवले होते. मात्र कालच्या सामन्यात कोहलीच्या अर्धशतकानंतर कॅमेरा अनुष्का वामिकाकडे फिरला अन् पहिल्यांदाच अनुष्कासोबत वामिकाचा चेहरा सर्वांना दिसला.
महत्वाच्या बातम्या:
- ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी- मुख्यमंत्री ठाकरे
- औरंगाबादेत शिवसेना-भाजप युती; नानांच्या सोबतीने सत्तारांनी फडकवला सेना-भाजपचा झेंडा!
- महाराणा प्रताप, छत्रपती शिवरायांना विरोध करत असाल तर; तलवार आजही आमच्या हातात, संजय राऊतांचा जलील यांना इशारा!
- “नापिकी, कर्जामुळे वृद्ध महिलेची आत्महत्या, मविआ सरकार मात्र…”, उपाध्येंचे टीकास्त्र
- रोहित पाटलांना मिळणार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष पद?; रोहित पवारांनी दिली माहिती


