Share

संजना दानवे कन्नड मतदार संघाच्या भावी उमेदवार?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : नवनिर्वाचित अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी सहा दिवस लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी, बीड येथून जनआशीर्वाद यात्रा काढली. ती यात्रा चार ते पाच जिल्ह्यात फिरून तिचा समारोप कन्नड येथे करण्यात आला. यावेळी रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे देखील यात्रेत सहभागी झाले. विशेष म्हणजे कन्नड शहरात जागो जागी संजना दानवेंचे होर्डिंग लावण्यात आले होते. त्यामुळे दानवे यांची कन्या कन्नड मतदार संघाची भावी उमेदवार असल्याचा सवाल स्थानिकांसह उपस्थिताना पडला.

जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींनी खांदे पालट करत मंत्री मंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यात शहराचे माजी महापौर तसेच नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेल्या भागवत कराडांना मंत्री मंडळात स्थान देत. त्यांना थेट अर्थराज्य मंत्री पद बहाल केल. त्यानंतर पक्षाने विभागानुसार नवनिर्वाचित मंत्र्यांना जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे फर्मान काढले. त्यानुसार डॉ कराड यांनी दि. १६ रोजी बीड येथून यात्रेला सुरुवात केली. तर दि. २१ रोजी कन्नड येथे यात्रेचा समारोप ठेवण्यात आला.

दरम्यान, सुरुवातीला शहरात समारोप करणार असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये होती. परंतु, यात दानवे यांनी त्यांच्या पद्धतीने खेळी करत यात्रेचा समारोप कन्नड येथे केला. जावई हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेला दानवे विरुद्ध उभ राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दानवे यांनी कन्नड येथे डॉ कराड यांच्या यात्रेचा समारोप करत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा संजना दानवे असस्ल्याचे चित्र कन्नड येथे जागोजागी लागलेल्या होर्डिंग वरून दिसत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!