🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सेना-भाजप युतीच्या शक्यतेचे संकेत दिले आहेत. दरम्यान यावरूनच राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. यावर सर्वच पक्षांची मते उमटत आहेत. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
‘मित्रपक्षांत कोणतीही नाराजी नाही, सर्व काही सुरळीत आहे, त्यामुळे यावर अधिक विचार करण्याची गरज नाही. तसेच कार्यक्रमांत असे होतच असते. हा अगदी गंभीर विषय नाही’. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान आज जयंत पाटील आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना एकाच कारमध्ये पाहण्यात आले. त्यामुळे यावरही आता वेगळ्याच चर्चांना तोंड फुटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार
- मोठी बातमी : भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादी आणि सेनेत करणार प्रवेश ?
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
