Share

खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे.

सध्या देशमुख हे गायब आहेत. ईडी त्यांचा शोध घेत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी देखील वाढत आहेत. ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभाग यांचा भाजप गैरवापर करत आहे असा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. याबाबत आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं असून त्यांनी आणि देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

‘अनिल देशमुख यांच्यावर होत असेलल्या आयकर विभागाच्या कारवाईकडे राजकीय भावनेतून पाहू नये. खंडणीखोरांनी देखील यांची कृती पाहून आत्महत्या करावी, अशी स्थिती आहे. अशा वागणुकीची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण हा देखील एक मोठा धोका आहे. पोलिसांचं गुन्हेगारीकरण होणं किंवा पोलिसांचं राजकीयीकरण होणं हा राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी चौथ्या स्तराचा कर्करोग आहे. म्हणून या प्रसंगात सखोल चौकशी केली जात आहे. त्याकडे आपण दोषपूर्ण नजरेनं न पाहाता महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे,’ अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!