मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे प्रमाणपत्र आम्ही जात पडताळणी समितीकडे देणार आहोत, त्यातून सत्य बाहेर येईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
समीर वानखेडेंच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र दाखवले जात आहे. वडिलांचे जात प्रमाणपत्र दाखवण्यापेक्षा समीर यांनी त्यांचे स्वत:चे प्रमाणपत्र दाखवावे, असे आव्हानच नवाब मलिक यांनी वानखेडेंना दिले आहे.
पुढे नवाब मलिक म्हणाले, एखादा दलित व्यक्ती गावखेड्यात अभ्यास करत असेल. या खोट्या दाखल्यामुळे त्याची संधी हुकली. जो व्यक्ती बनावट जन्म तारीख तयार करून शेड्यूल कास्टच्या कॅटेगिरीत नोकरी मिळवतो. त्याच्यामुळे इतरांची संधी हुकली आहे. आम्ही दिलेले बर्थ सर्टिफिकेट असली आहे. त्यावर त्याच्या वडिलांचं नाव दाऊद असं आहे. त्यानंतर या सर्टिफिकेटवर अल्टरेशन करण्यात आले, असेही मलिक यांनी सांगितले.
मुंबईत लोकांचे जन्म प्रमाणपत्र इंटरनेटद्वारे मिळवता येते. वानखेडेच्या बहिणीचे जन्म प्रमाणपत्र इंटरनेटवर आहे. पण समीर वानखेडेचे नाही. आम्ही खूप शोधल्यानंतर आम्हाला हे जन्म प्रमाणपत्र मिळाले. ज्ञानेश्वर वानखेडे जन्माने दलित आहेत. त्यांनी दलित असल्याचे प्रमाणपत्र घेतले. नोकरी मिळवली. त्यानंतर त्यांनी लग्न केले आणि धर्मांतर केले. त्यानंतर ते आयुष्यभर मुस्लिम म्हणून जगले.
त्यानंतर समीर वानखेडेंनी वडिलांच्या प्रमाणपत्राचा आधार घेत प्रमाणपत्र मिळवले. आम्ही या प्रकरणी दलित संघटना आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे प्रमाणपत्र बनवून नोकऱ्या मिळवल्या गेल्या. त्याच्या या पूर्वी तक्रारी आल्या. त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी जात पडताळणी समिती स्थापन करण्यात आली. पण केंद्राकडे अशी कमिटी नाही. केवळ जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र मिळवले जाते. आता या पडताळणी समीतीसमोर हे प्रमाणपत्र तपासण्याची मागणी करण्यात येणार आहे, असेही मलिकांनी सांगितले.
खोटे प्रमाणपत्र दिल्यास दोन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. स्क्रुनिटी कमिटीकडे तक्रार केली जाणार आहे. मी दिलेलं प्रमाणपत्र खोटे आहे तर तुमचे खरं प्रमाणपत्र जाहीर करा. वडिलांचे प्रमाणपत्र दाखवलं जात आहे. पण वानखेडेंनी त्यांचं प्रमाणपत्र दाखल करावे, अशी मागणीही मलिकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘ते’ प्रकरण हिमनगाचे एक टोक, मालक व नोकरांनी सावध राहावे; राऊतांचा इशारा
- गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार; सत्यपाल मलिकांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
