Share

“आघाडीत बिघाडी नाही, विधानपरिषदेच्या सहा जागा जिंकणारच” ; बाळासाहेब थोरातांचा विश्वास

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात भाजपचे पाच तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे आता राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषदेची निवडणुकी ही चुरशीची होणार स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. विधानपरिषदेत विजयी होण्यासाठी २६ मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीतील सर्व सहभागी पक्ष, अपक्ष आम्हाला मतदान करतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी होतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणविस यांनीही आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला. “विधान परिषदेच्या पाच जागा आम्ही लढवतोय. सत्तारुढ पक्षात खूप मोठा अनरेस्ट आहे. त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवीये म्हणून आम्ही ५ वी जागा लढवतोय. त्याचे काही आराखडे तयार केले आहेत. हे सोपं नाहीये पणपरीशेदेक, आम्ही विधान परीषेदेची ५ वी जागा जिंकणारच”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय हालचाली सुरु होत्या. परंतु महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये समन्वय न साधल्याने या प्रयत्नांना यश आले नाही.

विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार –

भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसनं भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. आता १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!