नवी दिल्ली -राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. गृह विभाग सांभाळणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कामगिरी तर अतिशय सामान्य राहिल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकांसह आढळलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे एपीआय सचिन वाझे यांना अटक झाली. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडीनंतर आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंती होणार असल्याची चर्चा आहे.
नवी दिल्लीमध्ये काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात जवळपास २ तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली.तसेच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याचे समजते.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी दिल्लीत पवारांची भेट घेतल्यावरून इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी देशमुख राजीनामा देणार असल्याचे वृत्त प्रसारित केले होते.यावर देशमुख म्हणाले की, माध्यमात माझ्या राजीनाम्याच्या बातम्या चालवल्या जात त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे जाहीर केले.
आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात मा.पवार साहेबांची भेट घेतली व मागील २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी #ATS व #NIA ने केलेल्या तपासाची चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या,त्यात कोणतेही तथ्य नाही.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 19, 2021
मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली, तसेच २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी एटीएस आणि एनआयएने केलेल्या तपासाची चर्चा झाली असल्याचीही माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- ‘वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

