टीम महाराष्ट्र देशा : सध्या करोनामुळे केलेल्या लॉक डाऊन मुळे राज्यातील विद्यापीठे व शैक्षणिक संकुल बंद आहेत. सध्याचा काळ परीक्षेचा काळ असतानाही कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच महामहिम राज्यपाल महोदयांसोबत राज्यातील सर्व कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आहे व त्यातून एक कुलगुरूंची समिती परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. या कुलगुरू समितीने राज्यामध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय केला आहे याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करत असल्याचे अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी सांगितले तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत अभाविप तडजोड करणार नसल्याचेही बेगडे यांनी सांगितले मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपुर आणि नाशिक या सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असले तरी राज्यातील काही जिल्हे कोरोना मुक्त आहेत त्यामुळे परीक्षा चे धोरण ठरवताना राज्यातील या सर्व बाबींचा विचार करावा या प्रकारचे निवेदनही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना दिले आहे तसेच राज्यात लॉकडाऊन उठल्यानंतर परीक्षा घेताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत या प्रकारच्या सूचनाही अभाविप ने केल्या आहेत त्या सूचना खालील प्रमाणे आहेत.
१) लॉकडाउन संपल्यानंतर लगेच महाविद्यालये सुरू न करता ती केंद्रीय मंत्री परिषदेने सुचवलेल्या निर्देशानुसार मे महिन्याच्या १६ तारखेपासून सुरू करावीत.
२)सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ वगळता अन्य सर्वच विद्यापीठांची परीक्षां एकाच ठराविक वेळेत घेण्यात याव्यात, जेणेकरून निकाल लावणे व पुढील शैक्षणिक सत्र एकाच वेळी सुरू होण्यास मदत होईल
३)विद्यापीठांच्या सर्व वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, कोणतीही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेऊ नये कारण त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
४)अचानक आलेल्या परिस्थितीमुळे Regular teaching hours पूर्ण होऊ शकलेले नाही त्यामुळे अनेक विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर वर्षाचे अभ्यासक्रम हे पूर्ण शिकवून झालेले नाही हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेस ही घेण्यात आले परंतु नेट कनेक्टिव्हीटी व विद्यार्थ्यांचा सहभाग यावर मतांतरे आहेत.
५)विद्यार्थ्यांनी आपले सर्व शैक्षणिक शुल्क भरलेले असताना त्यांना त्यांचे शिक्षण मिळण्याचा संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे बुडालेले Teaching Hours भरून काढून अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करावेत व त्यानंतर परीक्षा घ्याव्यात या धोरणामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होईल शक्य असल्यास आता लॉकडाऊन दरम्यान, अन्य शिकवणी पद्धतीचा अवलंब करण्यात यावा तसेच उरलेला अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू झाल्यावर पूर्ण करण्यात यावा.
६) प्रात्यक्षिक , Internal Assignment Project देण्याकरिता पुरेसा वेळ देण्यात यावा.
७)महाविद्यालये सुरू झाल्या नंतर सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता तो कमी करण्यासाठी टप्या टप्याने परिक्षा घेण्याची योजना व्हावी.
(उदा. प्रथम, द्वितीय,वर्ष परीक्षा अगोदर नंतर पदवी व पदव्युत्तर वर्षे असे)
८)पुढील विविध कोर्स प्रवेश व भविष्यातील रोजगारांची संधी लक्षात घेता महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना बोलवावे व त्यांचे राहिलेली शिकवणी सुरू करावी जेणेकरून तुलनेने कमी असलेले अंतिम वर्ष विद्यार्थी संख्या लक्षात घेता त्याचा सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण कमी होऊन परिस्थिती हाताळण्यासाठी मदत होईल.
९) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास व निकालास यायला लागणारा 30 ते 45 दिवसांचा वेळ व सध्याची भूतो न भविष्यती परिस्थिती लक्षात घेता प्रथम व द्वितीय वर्षाप्रमाणे सध्या सत्राच्या अंतिम वर्षाच्या अंतर्गत प्रात्यक्षिक व लेखी या सर्व परीक्षा विद्यार्थी शिकतो त्याच महाविद्यालयात घेण्यात येऊन त्या तिथेच तपासणीची योजना व्हावी जेणेकरून परीक्षा व निकाल वेळेत येण्यास मदत होईल सोबत कोरोना संसर्गाचा धोका कमी उद्भवेल यात परीक्षा प्रश्नपत्रिका नेहमीप्रमाणे विद्यापीठाने तयार करावीत.
१०) संख्येने अधिक असणारी प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा काही ठिकाणी सुरु झालेली असली तरी विद्यार्थी आरोग्य हित बघता राज्यात सरसकट 20 मे नंतर परीक्षा सुरू करावी कारण तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव ही थांबेल अशी अपेक्षा आहे तसेच राज्यातील सर्व सार्वजनिक यंत्रणा या आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सक्षम होत असतील त्यामुळे त्याचा विद्यापीठांवर ताण ही येणार नाही.
११)प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षा या ५० गुणांच्या घेवून त्यांचे १०० गुणांमध्ये रूपांतर करावे. अशा परीक्षा पॅटर्नमुळे परीक्षा कमी दिवसात व वेळेत होतील व त्याचा निकाल ही लवकर लावण्यास मदत होईल.
१२) दूर व मुक्त विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता राज्याच्या परीक्षांचे वेळापत्रक बनविताना अन्य सामान्य परीक्षा प्रमाणे त्यांचाही विचार होऊन त्याही वेळेस घेण्यात याव्यात.
१३) जून महिन्यापर्यंत सर्व परीक्षा पूर्ण झाल्या नंतर जुलै मध्ये निकाल येवून पुढील शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्याच्या मध्यापासून सुरु करता येईल. व पुढील शैक्षणिक वर्ष ऑगस्ट मध्ये सुरू करण्यास अडचण येणार नाही.
१४ ) सदर धोरणा नंतर पुढील शैक्षणिक वर्षात शिकवणी दिवस कमी होतील, त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रातील सुट्टी कमी करून ते दिवस भरून काढण्याची योजना करता येईल.
१५ ) मुंबई परिसरे, पुणे, नागपूर सारख्या अति संसर्गित असलेली शहरे व जिल्ह्यांतील लॉकडाउन ३ मे नंतर हसांगितांगविद्यार्थ्यांच्या आरोग्य हित सर्वोतोपरी समोर ठेऊन या ठिकांणाच्या परीक्षा थेट जून महिन्यातच घेण्यात याव्यात.
या सूचनांचा विचार करून राज्यातील पुढील परीक्षा धोरण ठरवावे अशा प्रकारचे निवेदन अभाविपच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना देण्यात आले असल्याचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

