Share

अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक; पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत

Published On: 

अहमदनगर:- यंदा कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेसाठी अनेक आजी माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. ह्या निवडणुकीसाठी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे, मंत्री शंकरराव गडाख, अशा दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, पारनेर तालुक्यातून सेवा संस्था मतदार संघातून बँकेच्या संचालक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके तसेच विद्यामान संचालक उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेच्यावतीने रामदास भोसले व भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच विखे गटाच्या वतीने राहुल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता नेमकी कोण माघार घेणार व कोणात लढत होणार, की मागील पंचवार्षिक प्रमाणे शेळके यांना बिनविरोध देणार याचीच चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

शरद पवार हे नुकतेच नगर जिल्हा दाैऱ्यावर आले होते. त्यावेळी शेळके व पवार हे एकत्र हेलीकॉप्टरमध्ये मुंबईस रवाना झाल्याने त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. शेळके यांचा सामना आता रामदास भोसले व राहुल शिंदे यांच्याबरोबर होणार, की या दोघांपैकी कोणीतरी माघार घेणार व तालुक्यातील लढत दुरंगी होणार की तिरंगी हे मात्र अर्ज माघारी नंतरच समजणार आहे.

तालुक्यात 105 सेवा संस्थेचे मतदार आहेत. सेवासंस्थांचे ठराव करतानाच शेळके यांनी त्यात लक्ष घातले होते. ठराव कोणाच्या नावे करावयाचा हे सुद्धा अनेक ठिकाणी शेळके यांनीच लक्ष घालून ठरविल्याने शेळके यांचा विजय सोपा मानाला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!