Share

ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का ? – जयंत पाटील

Published On: 

गोंदिया – काल एका भगिनीने ते BHEL चालू करा म्हणून आग्रह धरला पण त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे असा टोला लगावतानाच एक ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोंदिया येथील सभेत केला.

आज पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. युपीए सरकारच्या काळात २० पैसे वाढले तरी विरोधक बोंबाबोंब करायचे मात्र गतवर्षी पेट्रोल १२ रुपयांनी वाढले आहे. आता कुठे आहेत ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.

गोंदियाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना साथ दिली आहे. इथल्या जनतेच्या आशिर्वादाने या भागात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. एक वेळ होता की बरेचजण पक्षातून बाहेर पडत होते, आम्हाला त्यांच्या विनवण्या कराव्या लागत होते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. अनेक तरुण पक्षाकडे वळत आहेत आणि अशाच जिद्दी तरुणांची आम्हाला गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

खासदार प्रफुल पटेल यांनी नेहमीच इथल्या विकासासाठी पाठपुरावा केला आहे. धापेवाडा प्रकल्पाच्या कामासाठीही ते सतत संपर्कात आहेत म्हणून येणाऱ्या आर्थिक वर्षात धापेवाडा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १०० कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न करू त्याच पद्धतीने पुढच्या टप्प्यांचेही काम केले जाईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

पाण्याशी संबंधित इतरही काही मागण्या खासदार प्रफुल पटेल यांनी केल्या आहेत. २०२४ पर्यंत प्रफुल्ल पटेल यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या तालुक्याला प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून मुबलक पाणी साठा देण्याचा प्रयत्न करू असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, माजी खासदार मधुकर कुकडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष पंचामभाऊ भिसे, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी आमदार राजू जैन, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!