नवी दिल्ली – कोरोनामुळे होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी भारतात मोठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत 48.93 कोटीहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात आतापर्यंत 48,93,42,295 लसीचे डोस देण्यात आले आहे, यात पहिल्या आणि दुसऱ्या डोसचाही समावेश आहे. गेल्या 24 तासात कोरोना लसीचे सुमारे 37 लाख डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, एका बाजूला लसीकरण मोहीम जोरात सुरु असताना दुसऱ्या बाजूला डेल्टा व्हायरसचा धोका देखील वाढत आहे. यातच आता कोरोना व्हायरसच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांचं दोन डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालं आहे अशा लोकांना कोरोना संसर्गाचा धोका तीन पटीने कमी होतो. इम्पीरियल कॉलेज लंडन आणि इप्सोस मोरी यांनी केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे.
कोविड -19 संसर्गावरील यूकेच्या सर्वात मोठ्या अभ्यासापैकी एक असलेल्या रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन (REACT-1) अभ्यासानुसार, इंग्लंडमध्ये संसर्ग गेल्या REACT-1 रिपोर्टनंतर 0.15 टक्क्यांहून 0.63 टक्क्यांपर्यंत चौपट वाढलं. हे 20 मे रोजीपासून 7 जूनपर्यंतच्या कालावधीसाठी होतं. दरम्यान त्याच्या निकालांमध्ये 12 जुलैपासून प्रकरणांमध्ये घट झाली आहे.
इम्पीरियल कॉलेज लंडन आणि इप्सोस मोरी यांनी केलेल्या विश्लेषणात, 24 जून ते 12 जुलै दरम्यान इंग्लंडमधील अभ्यासात सहभागी झालेल्या 98 हजारांहून अधिक वॉलंटियर्स ध्ये असे आढळून आले की, ज्यांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे फार कमी लोक एकापासून दुसऱ्याकडे व्हायरस संक्रमित करतात असं दिसून आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
- मोठी बातमी : बार्सिलोनाला लियोनेल मेस्सीचा रामराम ; संपवले 21 वर्षाचे नाते
- पराभुत महिला हॉकी संघाला शाहरुख खानने दिला ‘हा’ संदेश, म्हणाला..
- ‘नुकसानग्रस्तांना भरीव मदत न दिल्यास फार मोठ्या आक्रोशास सरकारला सामोरे जावे लागेल’
- ’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय’ ; आगामी मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना


