Share

तुम्ही विकला गेला आहात…कंगनाने थेट ट्विट करून ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनाच सुनावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते कंगना नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्यावरून वारग्रस्त ट्विट करत असते आता तर कंगनाने थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनाच ट्विट केले आहे. कंगना कधी कोणावर बरसेल त्याचा काही, नेम नाही. रविवारी सकाळी कंगना ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर बरसली. कंगनाने जॅक डोर्सी यांचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून त्यांच्यावर मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांना विकले गेल्याचा आरोप केला. आता जॅक यांच्यावर इतका राग का तर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यामुळे.

ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट अस्थायी रूपाने बंद केले. यामुळे कंगना भडकली. तिने टिष्ट्वटरचे सीईओ जॅक डोर्सी यांंचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून काढले. ‘ट्विटर अभिव्यक्ति स्वातंत्र्यासोबत आहे. सत्य बोलणा-याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,’असे ट्विट जॅक डोर्सी यांनी 5 वर्षांपूर्वी केले होते. मात्र कंगनाने त्यांच्या या ट्विट आणि एकूणच ट्विटरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तिने लिहिले, ‘तुम्ही अजिबात अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करत नाही. मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांनी तुम्हाला पूर्णपणे खरेदी केले आहे. तुम्ही फक्त फायद्यासाठी काम करता. अशा लोकांव्यतिरिक्त अन्य लोकांसोबत तुम्ही पक्षपातीपणाने वागता. तुम्ही काय तर लोभाचे गुलाम बनले आहात. पुन्हा असले दावे करू नका, हे लाजीरवाणे वाटते,’ अशा शब्दांत कंगनाने जॅक यांना सुनावले. कंगनाच्या या ट्विट नंतर आता जॅक डोर्सी काय भूमिका घेणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!