नाशिक : गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, विशेषत: मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणवार झालेल्या पावसानं हाहाकार उडवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं आहे. या शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचा विश्वास देखील शेतकऱ्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिस्थिती बोलून दाखवली.
ग्लोबल वॉर्मिंग वगैरे यामुळे जिथे पाऊस पडायला हवा तिथे पडत नाही. जिथे पडतो तिथे खूप पडतोय. कधी दुष्काळ पडतोय. कधी पाऊस सगळंच वाहून नेतो. इथूनही फटका पडतोय, तिथूनही फटका पडतोय. बिचारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काम करत आहेत. या सगळ्याचं ग्लोबल वॉर्मिंग हे प्रमुख कारण आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. या कार्यक्रमामध्ये बोलताना छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंचा केलेला ‘बिचारे मुख्यमंत्री’ उल्लेख ऐकून अनेकांच्या भुवया काही क्षण उंचावल्या. मात्र, भुजबळ नेमके कोणत्या संदर्भात हे म्हणाले, हे स्पष्ट होताच उपस्थितांनी देखील त्याला सहमती दर्शवली.
दरम्यान, बाळासाहब ठाकरे आणि शिवसेनेच्या कृपेनं मी मुंबईचा महापौर होतो. पण प्रचंड कचरा निघायचा. लाखो टन कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न होता. नाशिक, पुणे सगळीकडे प्रत्येकाला वाटतं की कचरा टाकण्याची व्यवस्था हवी. पण माझ्याघराजवळ कचरा नको. पण या कचऱ्याचं पुढे काय करायचं याच्या काही शास्त्रीय पद्धती आता समोर आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला


