Share

“स्वतःला सिद्ध करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही”

Published On: 

नवी दिल्ली : सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जाईल. दरम्यान, दोन्ही संघ सध्या आपापल्या सरावात व्यस्त आहेत. दोन्ही संघ या कसोटीसाठी कसून सराव करताना दिसत आहेत.

अशा परिस्थितीत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या महत्त्वाच्या मालिकेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, दक्षिण आफ्रिकेवर घरच्या मैदानावर खेळण्याचे कोणतेही दडपण नसेल, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कहर करायला सज्ज होईल.

या संदर्भात रवी शास्त्री म्हणाले की, ‘आम्ही दक्षिण आफ्रिकेत कधीही मालिका जिंकलेली नाही, पण लक्षात ठेवा की यजमानांवर घरच्या मैदानावर खेळण्याचे दडपण नसले तरी विराट कोहलीचा हा संघ ही मालिका जिंकायला तयार आहे. नेहमीप्रमाणे टीम इंडियाला माझा पाठिंबा मिळेल. टीम इंडियासाठी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. विराट कोहली हा एक उत्तम कर्णधार आहे आणि त्याच्याकडे एक प्रतिभावान संघही या दौऱ्यावर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!