🕒 1 min read
मुंबई : गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ते परत हॉटेलवर गेले तसे ते कोसळले. त्यानंतर त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संगीताचं शिक्षण घेतलेले नसून देखील केके यांनी बरीच हिट गाणी गायली आणि त्यातूनच प्रसिद्धी मिळवली.
केके यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्याला प्रसिद्धीपासून कायम लांब ठेवले. त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल पहिले तर, त्यांनी त्यांच्या बालमैत्रिणीशी लग्न केले होते. त्यांच्या पत्नीचे नाव ज्योती आहे. यांना दोन मुले देखील आहेत. केके यांनी कपिल शर्मा शोमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. ज्योतीसोबत त्यांची ओळख शाळेमध्ये झाली आणि त्यावेळी ते सहावीत होते. केके म्हणाले, “मी आयुष्यात एकाच मुलीला डेट केलं ती म्हणजे माझी पत्नी ज्योती. त्यावेळी मी खूप लाजरा होतो म्हणून तिला व्यवस्थित डेटवरसुद्धा नेऊ शकलो नाही. या गोष्टीवरून आता माझी मूल देखील माझी चेष्टा करतात”.
केके आणि ज्योती यांनी १९९१ मध्ये लग्न केले होते. त्यांनी लग्नाच्या आधी सेल्समन म्हणून देखील काम केले आहे. काही दिवसातच केके या नोकरीला कंटाळले व त्यांनी नोकरी सोडून दिली. नंतर त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये करिअर सुरु केले यावेळी त्यांचे वडील आणि पत्नी यांची खंबीर साथ मिळाली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
