Share

‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत,’ती’ पत्र प्रहारमधून लवकरच छापतो’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- सामानाचा अग्रलेख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत अशी बोचरी टीका सामनाच्या मुखपत्रातून नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटलांवर करण्यात आली आहे.

काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली असून सुद्धा त्यांची टुटटूर सुरु आहे. वैफल्य, दुसरे काय!, असे टीकास्त्र भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दरम्यान, सेनेच्या या भूमिकेवरून आता आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना थेट इशाराच दिला आहे.

नितेश राणे यांनी ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘सामनाचं आमच्यावर प्रेम आहे. असणारच..का नाही असणार शेवटी Old is gold! पण, काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचं पण नाही. काही पत्र माझ्याकडे आहेत. तळकोकणच्या प्रहारमधून लवकरच छापतो. मग बघू कशी कुरकुर होते, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सेनेला दिला आहे.

‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले की फडणवीसांबद्दल उलट बोलायचं. राणेंना भेटले की उद्धव ठाकरेंबद्दल उलट बोलायचं. राज्यपाल भेटले की पवारांबद्दल उलट बोलायचं, असं करून स्वतःची किंमत संपवली, ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक, असा टोला नितेश राणे यांनी राऊतांना लगावला.

कोरोना नियंत्रणात महाविकास आघाडी अपयशी – रामदास आठवले

‘ग्रीन झोन’चे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा ‘रेड झोन’कडे वाटचाल करतोय’

उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करण्याचे संजय राउताचे स्वप्न? मग शरदचंद्र पवारांचे काय ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!