Share

‘ग्रीन झोन’चे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा ‘रेड झोन’कडे वाटचाल करतोय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवसेंदिवस राज्यात कोरोनाने चांगलेच हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. तसेच काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला फैलावर घेतले आहे. आ. राणे या प्रकाराबाबत संतापले आहेत. ‘सिंधुदुर्ग मध्ये करोना नाही पण प्रशाशना च्या हलगर्जी मुळे अजून एक रुग्ण सापडला आहे,’ असा आरोप राणेंनी केला आहे.

‘जिल्हा प्रशासनाने घरी सोडलेला व्यक्तीला करोना झाले असे समजते. आंबा वाहतुक करणाऱ्या ड्राईव्हर बदल सांगुनही लक्ष दिले नाही,’ असं म्हणत तीव्र नाराजी आमदार, नितेश राणेंनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘ग्रीन झोन चे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करत आहे,’ असं ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!