Share

‘जरंडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत, मग फक्त जरंडेश्वरच टार्गेट का?’, राजू शेट्टींचा सोमय्यांना सवाल

Published On: 

पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. सोमय्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधित कागदपत्रे ईडी समोर सादर केली. यावेळी कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या वादात उडी घेत सोमय्यांना सवाल केला आहे. ‘जरंडेश्वर कारखान्यासोबत आणखी ४३ कारखाने आहेत, मग फक्त जरंडेश्वरच का? असा सवाल केला आहे. अस झालं तर हे कारखाने शेतकऱ्यांना मिळणार का? गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायचं, अशी टीका राजू शेट्टी यांनी सोमय्यांवर केली.

साखर आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी म्हणून शेट्टी शुक्रवारी दुपारी पुणे येथे आले होते. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘किरीट सोमय्यांनी फक्त मोजकी नावे घेऊ नयेत. आम्ही पाच वर्षांपूर्वी याच कारखान्यांची यादी दिली होती. पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. पण त्यात पुढे काही झाले नाही. पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्यासाठी दहा वेळा तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना भेटलो. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भाजपचे नेते मोजक्याच कारखान्यांच्या चौकशीची मागणी करत आहेत’ असेही शेट्टी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!