Share

..तोवर आपल्याला चीनसमोर मान खाली घेऊन झुकावेच लागेल-सरसंघचालक मोहन भागवत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. जे मूळ रूपाने भारतातून येत नाही. आपण कितीही चीनबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चीनमधूनच येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहणं कमी होणार नाही, तोवर चीनसमोर मान खाली घेऊन झुकावेच लागेल’, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. भागवत यांनी आज रविवारी आयईएस राजा शिवाजी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमत्त ध्वजावंदन केलं. यादरम्यान त्यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्यतेबद्दल भाष्य केले.

‘कोणत्याही परकीय आक्रमकाचे पाय आपल्या भूमीवर पडले की संघर्ष सुरू होत असे. परकीय आक्रमकांनी भारतावर अनेकदा हल्ले केले. पण आपण १५ ऑगस्टला त्याला पूर्णविराम दिला आहे. लढाई लढणारे महान पुरुष आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची आठवण करण्याची ही वेळ आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपण आपलं जीवन जगण्यास मोकळे झालो, असे मोहन भागवत म्हणाले.

आत्मनिर्भर बनताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा. छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे. जे आपल्या देशात तयार होत नाही, जे अतिआवश्यक आहे तेच आपण निर्यात करायचे आहे. आपल्या अटींवर घ्यायचे आहे. स्वातंत्र्य तर आपल्याला मिळाले पण हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लोकांना योग्य बनणे आवश्यक आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. २१ व्या शतकात भारताला स्वप्न पूर्ण करण्यास रोखू शकत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांनी हे मत मांडलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!