Share

…तर ३ आठवड्यात मुंबईकरांचे लसीकरण करू ; आदित्य ठाकरेंचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे.

‘राज्य सरकार कोरोना लसीच्या थेट आयातीच्या शक्यतेवर विचार करत आहे, जेणेकरून जास्तीतजास्त लोकांना लसीकरण केलं जावं. जर असं झालं तर तीन आठवड्यांत मुंबईत सर्वांचं लसीकरण करण्याचा रोडमॅप तयार आहे.’ असा दावा मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. लसीची किंमत हे एक कारण नाही आणि राज्य सरकार लवकरात लवकार लस खरेदी करण्याचाही विचार करत असल्याचं ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या लसीच्या या तुटवड्यामुळे राज्य शासन एक महत्वाचा निर्णय घेणार आहे. राज्यात 1 कोटी 84 लाख लसीकरण झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली ३ लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहे. असा निर्णय घेणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!