Share

…तर उध्दव ठाकरे सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही – रामदास आठवले

Published On: 

अकोला : “आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जर भाजपचा विजय झाला, तर उद्धव ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आज भाजपाचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,” असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आठवले हे अकोल्यामध्ये बोलत होते. यावेळी आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अकोला महापालिकेसह राज्यातील आगामी सर्व महापालिका निवडणूका लढणार असल्याची माहिती दिली.

रामदास आठवले म्हणाले, “महाविकासआघाडीने आपले सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा केला असला तरी आमचाही दावा आहे की आमच्याच सर्व जागा निवडून येतील. कोणत्याही परिस्थितीत आमची पाचवी जागा ही निवडून येईल. आम्हाला अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांचाही पाठिंबा मिळतो आहे. आमच्याकडे देखील मतं आहेत. त्यामुळे भाजपाला राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत देखील यश मिळणार आहे,” असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

“भाजपाची ही पाचवी जागा निवडून आली, तर महाविकासआघाडीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ही निवडणूक हरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी राहणार आहे,” असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!