Share

“…तरी दोघांचे प्राण वाचले असते”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणे यांचा संताप

Published On: 

मुंबई: तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच निलेश राणे यांची या पार्श्वभूमीवरील ट्वीटर पोस्ट सध्या चर्चेत असल्याचे दिसू येत आहे.

“मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात १ व्हेंटिलेटर नाही. आज २ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान आकाश भास्करराव देशमुख आणि डॉ. स्वप्निल मारुती पिसे या दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बोट किनाऱ्याजवळ येत असताना लाटांच्या तडाख्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यावरूनच भाजपने मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!